Posts

Showing posts from August, 2025

हिंदू धर्मातील १४ आकड्यांचे महत्त्व

हिंदू धर्मातील उपयुक्त माहिती चौदा प्रकारचे जप - १ नित्यजप , २ नैमित्तिक , जप , ३ कम्यजप , ४ निषिद्ध जप , ५ प्रायश्चित्त जय , ६ अचल जप , ७ चल जप , ८ वाचिक जप , ९ उपांशु जप , १० भ्रमर जप , ११ मानस जप , १२ अखंड जप , १३ अजपा जप , आणि १४ प्रदक्षिणा जप . चौदा प्रकारचा भूतसमुदाय - १ सिद्ध , २ गुह्मक , ३ गंधर्व , ४ यक्ष , ५ राक्षस , ६ सर्प , ७ विद्याधर , ८ पिशाच - या आठ देवयोनि आणि ९ सरीसृप , १० वानर , ११ पशुअ , १२ मृग ( जंगली प्राणी ) १३ पक्षी - या पांच तिर्यग् ‌‍ योनि व १४ मनुष्य योनि . असा चौदा प्रकारचा भूतसमुदाय अथवा प्राणिमात्र होत . चौदा प्रकार यज्ञाचे - १ अग्निष्टोम , २ अत्यग्निष्टोअम , ३ उक्थ , ४ षोडशी , ५ वाजपेअय , ६ अतिरात्र , ७ आप्तोर्याम , ह्मा सात सोमसंस्था आणि ८ अग्निहोत्र , ९ दर्शपूर्णमास , १० आग्रयण , ११ पिण्डपितृयज्ञ , १२ चातुर्मास्य , १३ निरूढ पशुबंध आणि १४ सौत्रामणि . अशा सात हवियज्ञ संस्था मिळून चौदा प्रकार होत . चौदा प्रकार रुद्राक्षांचे - एक ते चौदा मुखें असलेल्या रुद्राक्षांचीं चौदा नांवें क्रमानें :- १ शिव . २ देवदेवेश्वर , ३ अनल , ४ ब्रह्मा , ५ कालाग्निरुद्र , ६ कार...